पोस्ट्स

एसआयपी चे फायदे - Advantages of SIP

इमेज
एसआयपी चे फायदे -  Advantages of SIP किमान रकमेतील गुंतवणूक  (  Minimum investment in SIP )                अगदी कमीत कमी रकमेत देखील आपण आपल्या म्युचुअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकतो. विद्यार्थी असो, गृहिणी असो किंवा एखादा उद्योगपती असो जर कोणालाही चांगला व्याजदर मिळवून पैसे साठवायचे असतील तर ते म्युचुअल फंड च्या एसआयपी प्लॅन पासून सुरुवात करू शकतात. एसआयपी चा सर्वात चांगला फायदा आहे की आपण कमीतकमी रकमेत गुंतवणूक सुरू करू शकतो. एसआयपी मधील तरलता ( Liquidity in SIP )                लिक्वीडिटी म्हणजेच यामधील तरलतेबद्दल बोलायचं झालं तर एसआयपी या बाबतीत उत्तम आहे म्हणजेच गुंतवणूकदार आपले पैसे यातून हवे तेव्हा काढून घेऊ शकतो ते ही कोणत्याही प्रकारचे अधिकचे शुल्क न देता. जर ठराविक कालावधी साठी कोणी एसआयपी करत असेल आणि अचानक त्याला त्या पैशांची गरज पडली तर ते पैसे काढता येऊ शकतात. परंतु ELSS सारख्या काही ठराविक फंड मध्ये ही सुविधा नसते. अधिक परतावा (  Good return...

एसआयपी (SIP)- Systematic Investment Plan म्हणजे काय?

इमेज
एसआयपी (SIP)-  Systematic Investment Plan म्हणजे काय ? जेव्हा आपण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतो तेव्हा आपणाला त्यात गुंतवणूक करण्याचे दोन मार्ग मिळतात . एक म्हणजे लंपसम ( Lumpsum )गुंतवणूक म्हणजेच एक रकमी गुंतवणूक आणि  दुसरा मार्ग म्हणजे एसआयपी द्वारे गुंतवणूक.( SIP )          एसआयपी म्हणजे एखादी स्कीम आहे, असा गैरसमज अनेक लोकांचा असतो. परंतु तसे अजिबात नहीं एसआयपी समजून घेणे एवढेही अवघड नाही जेवढे दिसत असते.                    एसआयपी म्हणजे काही कसले रॉकेट सायन्स नाही जे समजायला अवघड जाईल. एसआयपी ही कसलीही स्कीम नाही तर हे एक फक्त माध्यम आहे गुंतवणूक करण्याची एक पद्धत आहे. ज्यामध्ये एक ठराविक रक्कम एका ठराविक दिवशी आपल्या गुंतवणुकीत जोडली जात असते. उदाहरणार्थ ▬▬▬▬▬ आपल्याकडे १२,००० रुपये आहेत. आपण हे सगळे पैसे एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये सरसकट गुंतवू शकतो आणि जर तेच १२,००० जर आपण महिन्याला १००० अशा पद्धतशीरपणे एक वर्षासाठी गुंतवत राहिलो तर ती ह...

म्युच्युअल फंड म्हणजे काय?

इमेज
  म्युच्युअल फंड म्हणजे काय? 1 . अनेक लोकांना म्युच्युअल फंड फार गुंतागुतीचे किंवा भीतीदायक वाटू शकतात . आम्ही आपल्याला हा विषय सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत . विशेषतः , म्युच्युअल फंडमध्ये पुष्कळ लोकांचा ( म्हणजे गुंतवणूकदारांचा ) पैसा एकत्र आणला जातो . या निधीचे व्यवस्थापन प्रोफेशनल फंड व्यवस्थापक करतात . 2. ही एक व्यवस्था आहे जी , ज्यांची गुंतवणुकीची उद्दिष्टे समान अशा अनेक गुंतवणूकदारांकडून निधी गोळा करण्याचे काम करते . नंतर ही व्यवस्था त्या पैशाला इक्विटी , बाँड , रोखे बाजारातील उपकरणे आणि / किंवा इतर सिक्युरिटीजमध्ये गुंतवते . 3. प्रत्येक गुंतवणूकदाराला युनिट्स दिले जातात , हे युनिट्स त्या निधीतील त्यांचा भागाचे प्रतिनिधित्व करत असतात .  स्किमच्या " नेट ॲसेट व्हॅल्यू किंवा एनएव्ही " ची गणना करून त्यातून खर्चांसाठी काही भाग वजा करून , या एकत्रित निधीतून झालेला लाभ / मिळकत सर्व गुंतवणूकदारांमध्ये त्यांच्या गुंतवणुकीच्या अनुपाताने वाटली जाते . थोड...

तुम्ही बचतीतून गुंतवणुकीकडे कधी वळले पाहिजे?

इमेज
तुम्ही बचतीतून गुंतवणुकीकडे कधी वळले पाहिजे ? मागील पोस्ट मध्ये आपण बचत व गुंतवणूक दोन्ही का महत्वाचे आहे ते बघितले . आज आपण बचतीतून गुंतवणुकीकडे कधी वळले पाहिजे ? हे बघू …. पावसाळ्याच्या दिवसासाठी काही रोख रक्कम असणे आवश्यक आहे . तथापि , त्यातून कोणताही परतावा न मिळवता कोणी किती पैसे बँकेत किंवा निष्क्रिय पडून ठेवू शकतो ? एखाद्या वेळी , जेव्हा रोख जास्त असते , तेव्हा एखाद्याने आपली बचत गुंतवणुकीसाठी वळवायला सुरुवात केली पाहिजे आणि भविष्यातील आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी काही परतावा मिळवावा . गुंतवणूक ही प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत व्यक्तिनिष्ठ असते . प्रत्येकाचे  स्वतःचे ध्येय आणि उद्दिष्टे त्यांच्या जीवनात पूर्ण करण्यासाठी असतात . त्यामुळे बचत आणि गुंतवणुकीच्या संदर्भात त्या प्रत्येकाची वेळ वेगवेगळी असते . गुंतवणुकीसाठी योग्य वय किंवा वेळ नमूद करणारा कोणताही मार्गदर्शक नाही . तथापि , ते त्यांचा गुंतवणूक प्रवास सुरू करण्यास तयार आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी कोणी ...