पोस्ट्स

जून, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आपण दिर्घकालीन गुंतवणूक केलेली असेल आणि मधल्या काळात जर बाजार पडला तर काय होईल?

इमेज
आपण दिर्घकालीन गुंतवणूक केलेली असेल आणि मधल्या काळात जर बाजार पडला तर काय होईल? Systematic Investment Plan एसआयपीच्या माध्यमाने दिर्घकालीन गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड गुंतवणूकदार नेहमी बाजार पडला तर काय होईल ह्या चिंतेत असतात. बाजाराची वेळ आणि अस्थिरता या सारख्या म्युच्युअल फंड्समधील काही जोखमींवर मात करण्यासाठी एसआयपी (SIP) उत्तमप्रकारे काम करतात. आपण एसआयपीच्या माध्यमाने म्युच्युअल फंडमध्ये नियमितपणे गुंतवणूक करून बाजारातील चढ-उतारांवर खर्चाच्या सरासरीच्या (Average) नियमाने मात करू शकता. जेव्हा एनएव्ही कमी असते तेव्हा आपण अधिक युनिट्स खरेदी करता आणि तसेच ह्याच्या उलट सुद्धा होते. जर एनएव्हीमध्ये चढ-उतार होत असले तर दीर्घकालामध्ये प्रत्येक युनिटचा भाव सरासरीप्रमाणे असतो. उदाहरणार्थ, जर आपण दर महिन्याला रु.1,000/- गुंतवले, तर एनएव्ही रु. 10 असताना आपल्याला 100 युनिट मिळतील आणि एनएव्ही रु. 5 वर आल्यावर आपल्याला 200 युनिट मिळतील. दीर्घकालामध्ये जर बाजारामध्ये चढ आणि उतार दोन्ही होत राहिले तर प्रत्येक युनिटमागचा सरासरी दर कमी होईल आणि त्याने परताव्यातील चढ-उतार सुद्धा कमी होईल...

दीर्घकाळ गुंतवणूक करण्याचे फायदे काय आहेत?

इमेज
दीर्घकाळ गुंतवणूक करण्याचे फायदे काय आहेत? असा सल्ला बरेच ब-याच म्युच्युअल फंड वितरक आणि गुंतवणूक सल्लागारांकडून दिला जातो. हे काही म्युच्युअल फंड्स बाबतीत खरेही आहे-   चला आपण समजून घेऊया, की व्यावसायिक असा सल्ला का देतात. दीर्घकाळ मुदतीमध्ये नक्की काय घडते? दीर्घकाळ गुंतवणूक करण्यामध्ये खरचं फायदा होतो का? आपल्या म्युच्युअल फंडला एक चांगल्या दर्जाचा फलंदाज समजा. प्रत्येक चांगल्या दर्जाच्या फलदांजची स्वतःची बॅटिंग करण्याची एक शैली असते. पण चांगल्या दर्जाचा फलंदाज जास्तीत जास्त धावसंख्या तेव्हाच करु शकेल जेव्हा तो जास्त वर्षासाठी खेळत राहील. आपण " चांगल्या दर्जा" च्या फलंदाजाच्या कारकिर्दीबद्दल बोलत आहोत. प्रत्येक चांगला फलंदाज हा कधी ना कधी चांगली आणि वाईट कामगिरी करतच असतो. सरासरीमध्ये त्याची कारकीर्द प्रभावी असणे महत्त्वाचे असते. तसेच, चांगल्या म्युच्युअल फंड मध्ये कधीकधी निधी व्यवस्थापकाच्या नियंत्रणात नसलेल्या घटकांमुळे चढउतार होतात. जर गुंतवणूकदाराने ह्या फंड मध्ये दीर्घकाळ  गुंतवणूक केली तर त्याला नक्कीच फायदा होईल.  त्यामुळे, जर आपल्याला शक्य असेल तर आपण...

दीर्घकाळाचा अर्थ कमी जोखीम असा होतो का?

इमेज
दीर्घकाळाचा अर्थ कमी जोखीम असा होतो का?   म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी योग्य कालावधीची गरज असते . योग्य कालावधी असल्याने गुंतवणुकीपासून अपेक्षित परतावा मिळण्याची अधिक शक्यता असते , एवढेच नाही तर गुंतवणुकीतील जोखीमसुद्धा कमी होते . मग , " जोखीम " म्हणजे नक्की काय ? सोप्या शब्दांत , याचा अर्थ गुंतवणुकीच्या परताव्यातील अस्थिरता , तसेच गुंतवलेले भांडवल कमी होण्याची शक्यता असा आहे . दिर्घकालासाठी गुंतवणूक कायम ठेवल्याने , कमी / ऋणात्मक परताव्याची काही वर्षे आणि अपेक्षेपेक्षा अधिक परताव्याची काही वर्षे ह्यांच्या सरासरीनुसार मिळणारा परतावा बऱ्यापैकी असतो . त्यामुळेच , गुंतवणूकदार ' प्रत्येक वर्षाच्या अस्थिर परताव्याच्या सरासरी मुळे ' दिर्घकालामध्ये अधिक स्थिर परतावा मिळवू शकतात . शिफारस केलेला कालावधी हा म्युच्युअल फंडचा प्रकार आणि ॲसेट क्लास या नुसार निराळा असतो . गुंतवणुकीचा निर्णय घेण्याआधी कृपया एखाद्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या आणि स्किम - संबंधी दस्तऐवज वाच...

म्युच्युअल फंड्स मधून आपण कोणत्या प्रकारच्या फायद्याची अपेक्षा करावी ?

इमेज
म्युच्युअल फंड्स मधून आपण कोणत्या प्रकारच्या फायद्याची अपेक्षा करावी ? कुणीतरी असे विचारल्याची कल्पना करा : वाहने कोणत्या वेगाने धावतात ? वाहन , या संपूर्ण वर्गासाठी आपण एकच सामान्य उत्तर देऊ शकता का ? वेगवेगळी वाहने वेगवेगळ्या वेगाने धावतात - जरी ती वाहन या एकाच प्रकारात मोडत असली तरी , उदा . मोटारी , मोटार ही शहरांतील रस्त्यासाठी बनली असल्यामुळे ती एका ठराविक कमाल वेगाने धावेल , एखादी रेसिंगसाठी असलेली मोटार जास्त वेगाने धावू शकेल . इथे म्युच्युअल फंड नावाचे एकच उत्पादन नाहीये , इथे वेगवेगळ्या म्युच्युअल फंड्सचे प्रकार आहेत .    वेगवेगळ्या वर्गातील म्युच्युअल फंड्स मधून येणारे परतावे वेगवेगळे असतात आणि काही फंडचे वेगवेगळे प्रकार आहेत ज्यांची कामगिरी उच्च पातळीवरची अनिश्चितता दर्शविते . जर म्युच्युअल फंड्स , जिथे किमतीमध्ये खूपच चढ - उतार होत आहेत अशा बाजारात गुंतवणूक करत असतील , तर त्या फंडच्या नेट अॅसेट व्हॅल्यू (NAV) मध्ये मोठे चढ - उतार दिसू शकतात ( उदा . इक्वि...

म्युच्युअल फंड एखाद्या बचत खाते किंवा मुदत ठेवी प्रमाणे निश्चित परतावा का देत नाहीत?

इमेज
म्युच्युअल फंड एखाद्या बचत खाते किंवा मुदत ठेवी प्रमाणे निश्चित परतावा का देत नाहीत? म्युच्युअल फंडचा परतावा अनेक गोष्टींवर अवलंबून असतो, जसे आपण गुंतवणुकीसाठी निवडलेले मार्ग, निरनिराळ्या बाजारांची काम करण्याची पद्धत, फंड व्यवस्थापन टीमचे कौशल्य आणि गुंतवणुकीचा कालावधी. यातील अनेक घटक अनिश्चित असल्यामुळे , परतावाबद्दल कोणतीही हमी देता येत नाही , याउलट मुदत ठेवी मध्ये हे घटक बहुतांश प्रमाणात नसतात . मुदत ठेवी मध्ये - परतावा निश्चित असतो , फक्त एका निश्चित कालावधीसाठी . हा परतावा आणि त्याचा कालावधी , दोन्हीही जारी करणारी कंपनी ठरवते , गुंतवणूकदार नाही . म्हणूनच , जर एखाद्याला सहा वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल आणि मुदत ठेव पाच वर्षांसाठीच उपलब्ध असते , तर परतावा पाच वर्षांसाठीच माहिती असतो , पण संपूर्ण सहा वर्षांसाठी नाही . त्यामुळे , फक्त निश्चित परतावा देणाऱ्या गुंतवणुकांमध्येच गुंतवणुकीचा परतावा माहीत असतो , जिथे गुंतवणुकीची मुदतपूर्ती आणि गुंतवणूकदारांचा कालावधी हे तंतोतंत जुळतात . ब्लॉग पोस्ट आवडल्यास नक्...

म्युच्युअल फंडस संपत्ती निर्माणामध्ये मदत करू शकतात का?

इमेज
म्युच्युअल फंडस संपत्ती निर्माणामध्ये मदत करू शकतात का? आपण आपला पैसा अशा व्यापार आणि व्यवसायांमध्ये गुंतवून संपत्ती निर्माण करू शकतो जे स्वतः मालमत्ता निर्माणाच्या मार्गावर आहेत. आपल्याला उद्योजकांच्या व्यवसायामध्ये, त्यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून, गुंतवणूकदार बनता येते. असे उद्योजक आणि व्यवस्थापक जसजसे त्यांचा व्यवसाय कार्यक्षमपणे चालवून लाभ मिळवतात, तसतसे त्यांच्या शेअरधारकांना त्याचा फायदा मिळतो. यामुळे संपत्ती निर्माणासाठी म्युच्युअल फंड्स उत्तम मार्ग आहेत. पण आपल्याला कसे कळणार की केव्हा, कुठले शेअर्स विकत घ्यावे ते? यासाठीच तर व्यावसायिक लोकांची मदत महत्त्वाची ठरते. म्युच्युअल फंड्सकडे फार मोठी रक्कम उपलब्ध असल्याने ते एकाच वेळी अनेक  संधींचा फायदा घेण्यास सक्षम असतात. जसे संतुलित आहारासाठी आपल्याला प्रथिने , जीवनसत्त्वे , कर्बोदके इत्यादींचा गरज असते . यातील एकाचेच सेवन अधिक केल्याने पोषक तत्त्वांची कमतरता भासते . त्याच प्रमाणे , एखाद्या डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडमध्ये आपण अर्थकारणाच्या निरनिराळ्या विभागांच्या संपर्कात येतो , तस...

एनएव्ही (NAV) कमी किंवा अधिक असल्यामुळे आपल्या गुंतवणुकीच्या निर्णयावर प्रभाव पडला पाहिजे का?

इमेज
एनएव्ही (NAV) कमी किंवा अधिक असल्यामुळे आपल्या गुंतवणुकीच्या निर्णयावर प्रभाव पडला पाहिजे  का ? जेव्हा आपण 'लार्ज' किंवा 'रेग्युलर' पिझ्झा मागवता, तेव्हा त्यांच्या चवीमध्ये काही फरक पडतो का? मुळीच नाही! दोन्हीची तयार करण्याची पद्धत आणि प्रक्रिया सारखीच असते. फक्त त्यांच्या आकारामध्ये आणि किंमतीमध्ये फरक असतो. कुठल्याही आकाराचा असला, तरीही फार्महाउस पिझ्झाची चव सारखीच असते.                        म्युच्युअल फंडची चव देखील या पिझ्झा सारखीच असते. जेव्हा आपण एखादा फंड विकत घेता, तेव्हा आपल्याला त्याचे युनिट खरेदी करण्यासाठी त्याची किंमत, म्हणजे एनएव्ही द्यावी लागते. बरेच गुंतवणूकदार असलेल्या मोठ्या फंडकडे अधिक मालमत्ता असेल आणि त्यामुळे त्याचा एनएव्ही अधिक असेल. पण तोच फंड बाजारात आला त्यावेळी त्याच फंडचा एनएव्ही बराच कमी असेल, कारण फंडचा एनएव्ही कालाप्रमाणे वाढत असतो कारण अधिक गुंतवणूकदार एकत्र आल्याने फंड वाढत जातो. पण याचा अर्थ असा होतो का, की फंडच्या कृतीमध्ये किंवा त्याच्या रचनेच्या प्रक्रियेमध्ये बदल झालेला आ...