म्युच्युअल फंड्स मधून आपण कोणत्या प्रकारच्या फायद्याची अपेक्षा करावी ?

म्युच्युअल फंड्स मधून आपण कोणत्या प्रकारच्या फायद्याची अपेक्षा करावी ?

कुणीतरी असे विचारल्याची कल्पना करा: वाहने कोणत्या वेगाने धावतात ?

वाहन, या संपूर्ण वर्गासाठी आपण एकच सामान्य उत्तर देऊ शकता का? वेगवेगळी वाहने वेगवेगळ्या वेगाने धावतात - जरी ती वाहन या एकाच प्रकारात मोडत असली तरी, उदा. मोटारी, मोटार ही शहरांतील रस्त्यासाठी बनली असल्यामुळे ती एका ठराविक कमाल वेगाने धावेल, एखादी रेसिंगसाठी असलेली मोटार जास्त वेगाने धावू शकेल.

इथे म्युच्युअल फंड नावाचे एकच उत्पादन नाहीये, इथे वेगवेगळ्या म्युच्युअल फंड्सचे प्रकार आहेत.
  
वेगवेगळ्या वर्गातील म्युच्युअल फंड्स मधून येणारे परतावे वेगवेगळे असतात आणि काही फंडचे वेगवेगळे
प्रकार आहेत ज्यांची कामगिरी उच्च पातळीवरची अनिश्चितता दर्शविते.




जर म्युच्युअल फंड्स, जिथे किमतीमध्ये खूपच चढ- उतार होत आहेत अशा बाजारात गुंतवणूक करत असतील, तर त्या फंडच्या नेट अॅसेट व्हॅल्यू (NAV) मध्ये मोठे चढ-उतार दिसू शकतात (उदा. इक्विटी फंड्स मध्ये गुंतवणूक करणारे ग्रोथ फंड्स); परंतु, जर त्यांनी जिथे जास्त चढ-उतार होत नाहीत, अशा बाजारात गुंतवणूक केली, तर त्या फंडची नेट ॲसेट व्हॅल्यू (NAV) बऱ्याच प्रमाणात स्थिर असेल (उदा. मनी मार्केट मध्ये गुंतवणूक करणारे लिक्विड फंड्स). दुसऱ्या शब्दात, एक लिक्विड फंड, इक्विटी फंडच्या तुलनेत बरीच कमी अनिश्चितता दाखवतील.






ब्लॉग पोस्ट आवडल्यास नक्की लाईक  व इतरांनां  शेअर करा. 

आणि  असेच नव- नवीन माहितीसाठी ब्लॉगला  सबस्क्राईब करा. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

म्युच्युअल फंडस संपत्ती निर्माणामध्ये मदत करू शकतात का?

आर्थिक नियोजनासाठी 'हे' टप्पे वापरणे गरजेचे......