म्युच्युअल फंड म्हणजे काय?
म्युच्युअल फंड म्हणजे काय?
1. अनेक लोकांना म्युच्युअल फंड फार गुंतागुतीचे किंवा भीतीदायक वाटू शकतात. आम्ही आपल्याला हा विषय सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. विशेषतः, म्युच्युअल फंडमध्ये पुष्कळ लोकांचा (म्हणजे गुंतवणूकदारांचा) पैसा एकत्र आणला जातो. या निधीचे व्यवस्थापन प्रोफेशनल फंड व्यवस्थापक करतात.2. ही एक व्यवस्था आहे जी, ज्यांची गुंतवणुकीची उद्दिष्टे समान अशा अनेक गुंतवणूकदारांकडून निधी गोळा करण्याचे काम करते. नंतर ही व्यवस्था त्या पैशाला इक्विटी, बाँड, रोखे बाजारातील उपकरणे आणि / किंवा इतर सिक्युरिटीजमध्ये गुंतवते.
3. प्रत्येक गुंतवणूकदाराला युनिट्स दिले जातात, हे युनिट्स त्या निधीतील त्यांचा भागाचे प्रतिनिधित्व करत असतात. स्किमच्या "नेट ॲसेट व्हॅल्यू किंवा एनएव्ही" ची गणना करून त्यातून खर्चांसाठी काही भाग वजा करून, या एकत्रित निधीतून झालेला लाभ/ मिळकत सर्व गुंतवणूकदारांमध्ये त्यांच्या गुंतवणुकीच्या अनुपाताने वाटली जाते. थोडक्यात सांगायचे झाले, तर म्युच्युअल फंड सामान्य माणसासाठी सर्वात योग्य अशी गुंतवणूक आहे कारण यात विविध क्षेत्रांमध्ये, व्यावसायिक व्यवस्थापन केलेल्या अनेकविध सिक्युरिटीजमध्ये, कमी खर्चात गुंतवणूक करण्याची संधी मिळते.
म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे काय आहेत?
- आपल्यांतील अनेक जणांना स्वतःच्या गुंतवणुकींचे व्यवस्थापन करणे जिकीरीचे वाटते. एखाद्या प्रोफेशनल फंड व्यवस्थापन कंपनीमध्ये विविक्षित कामांसाठी लोकांना त्यांच्या शिक्षणाच्या आधारे, तसेच अनुभव आणि कौशल्याच्या आधारे नियुक्त केले जाते.
- एक गुंतवणूकदार या नात्याने आपण स्वतःचा आर्थिक व्यवहार स्वतः पाहू शकता, किंवा एखाद्या प्रोफेशनल कंपनी कडून हे काम करवू शकता. आपण जेव्हा यातील दुसरा पर्याय निवडता तेव्हा:---
- आपल्याला हे काम कशापद्धतीने उत्तमरित्या करावे हे माहिती नसते - आपल्यापैकी बरेचजण आपला आयकर भरण्याचे काम इतरांकडून करवून घेतात, किंवा आपण सगळेच घराचा आराखडा एखाद्या आर्किटेक्टकडून बनवून घेतो.
- आपल्याकडे यासाठी पुरेसा वेळ नसतो किंवा ते काम करण्याची आपली इच्छा नसते. आपल्याला गाडी चालवता येत असली तरी आपण ड्रायव्हर ठेवतो तसेच हे आहे.
- एखादे काम स्वतः करण्याऐवजी ते दुस-याकडून घेण्याने बचत होण्याची शक्यता अधिक असते. जसे, स्वतःची गाडी घेऊन महागडा प्रवास करण्यापेक्षा ट्रेनने प्रवास करणे स्वस्त पडते.
- आपला वेळ आपण आपल्या आवडी / निवडीची इतर कामे करण्यासाठी वापरु शकता.
- म्युच्युअल फंड्सचा सर्वात महत्त्वाचा फायदा हाच आहे की आपल्याला प्रोफेशनल फंड मॅनेजमेंटचा लाभ मिळतो. खालील इन्फोग्राफिक मध्ये इतर फायदे दर्शवलेले आहेत. इतके सर्व फायदे असताना, आपल्याला गुंतवणुकीसाठी इतर गुंतवणुकीच्या पर्यांयाकडे बघण्याचे कारणच उरत नाही.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubts, please let me know.