एसआयपी चे फायदे - Advantages of SIP
एसआयपी चे फायदे - Advantages of SIP
किमान रकमेतील गुंतवणूक ( Minimum investment in SIP )
अगदी कमीत
कमी रकमेत
देखील आपण
आपल्या म्युचुअल
फंड मध्ये
गुंतवणूक करण्यास
सुरुवात करू
शकतो. विद्यार्थी
असो, गृहिणी
असो किंवा
एखादा उद्योगपती
असो जर
कोणालाही चांगला
व्याजदर मिळवून
पैसे साठवायचे
असतील तर
ते म्युचुअल
फंड च्या
एसआयपी प्लॅन
पासून सुरुवात
करू शकतात.
एसआयपी चा
सर्वात चांगला
फायदा आहे
की आपण
कमीतकमी रकमेत
गुंतवणूक सुरू
करू शकतो.
एसआयपी मधील तरलता ( Liquidity in SIP )
लिक्वीडिटी म्हणजेच
यामधील तरलतेबद्दल
बोलायचं झालं
तर एसआयपी
या बाबतीत
उत्तम आहे
म्हणजेच गुंतवणूकदार
आपले पैसे
यातून हवे
तेव्हा काढून
घेऊ शकतो
ते ही
कोणत्याही प्रकारचे
अधिकचे शुल्क
न देता.
जर ठराविक
कालावधी साठी
कोणी एसआयपी
करत असेल
आणि अचानक
त्याला त्या
पैशांची गरज
पडली तर
ते पैसे
काढता येऊ
शकतात. परंतु
ELSS सारख्या काही
ठराविक फंड
मध्ये ही
सुविधा नसते.
अधिक परतावा ( Good return on investment )
म्युच्युअल फंड
च्या एसआयपी
प्लॅन मध्ये
काही काळानंतरच
आपणाला गुंतवणुकीवर
चांगला परतावा
मिळाल्याचे दिसून
येते. परंतु
जर दीर्घ
कालावधीसाठी एसआयपी
केली गेली
तर मात्र
अधिक परतावा
मिळालेला दिसून
येतो. अधिक
प्रमाणात परतावा
मिळवण्यासाठी एसआयपी
ही दीर्घकालीन
असावी. तज्ज्ञांच्या
मते एसआयपी
द्वारे आपल्या
गुंतवणुकीवर अधिकाधिक
प्रमाणात परतावा
मिळवण्यासाठी गुंतवणूक
ही किमान
५ वर्षे किंवा
त्यापेक्षा जास्त
असावी.
एसआयपी मधील लवचिकता ( Flexibility in SIP )
- एसआयपी चा हा एक फायदा आहे की एसआयपी आपल्याला प्रचंड लवचिकता प्रदान करते. म्हणजेच यामध्ये गुंतवणूकदार कधीही आपले पैसे काढून घेऊ शकतो. तसेच गुंतवणूकदार आपला एसआयपी प्लॅन हवा असेल तेव्हा थांबवू शकतो. एसआयपी मधील जुने पैसे काढून घेऊ शकतो किंवा अजून नवीन पैशांची गुंतवणूक करू शकतो.
- एसआयपी मध्ये पूर्णपणे लवचिकता आणि पारदर्शकता देखील पाहायला मिळते. परंतु जर ELSS सारख्या फंड मध्ये एसआयपी चालू असेल तर त्यामध्ये प्रत्येक एसआयपी हप्त्याची रक्कम ही ३ वर्षासाठी लॉक इन केली जाते. तिथे गुंतवणूकदार मध्येच ती रक्कम काढू शकत नाही.
कमी प्रमाणातील जोखीम ( Low risk SIP )
जर गुंतवणूकदार इक्विटी फंड मध्ये आपल्या पैशांची गुंतवणूक करत असेल तर तिथे एकाच बाजार भाव चक्रात गुंतवणूकदाराचे पैसे गुंतवले जात नाहीत तर ज्यामुळे त्यातली थोडी जोखीम कमी होत असते.भावाची सरासरी (market cost averaging)
दीर्घकालीन एसआयपी
मध्ये वेगवेगळ्या
किमतींवर युनिट्स
खरेदी केले
जात असल्याने
आणि शेवटी
बाजार भावाची
सरासरी (market cost averaging) काढली जात असल्याने
गुंतवणुकीवर जास्त
नकारात्मक प्रभाव
पडताना दिसून
येत नाही.
ब्लॉग पोस्ट आवडल्यास नक्की लाईक व इतरांनां शेअर करा.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubts, please let me know.