पहिली सवय म्हणजे बचत...... तेव्हाच गुंतवणुकीसाठी पैसे जमा होतील.

आर्थिक विकासासाठी सर्वात महत्त्वाची पहिली सवय म्हणजे बचत.

जेव्हा बचत केली जाईल तेव्हाच गुंतवणुकीसाठी पैसे जमा होतील.

आज आपण बचतीच्या व्यक्तिमत्त्वाबाबत पाहणार आहोत.

सर्वसाधारण लोक बचतीची अशी व्याख्या करतात--


 

हे लोक बचत करण्यात अपयशी ठरतात, कारण त्यांना खर्च करताना गरज (need) आणि मागणी (demand) हे समजणे कठीण जाते.

 

बचतीचे व्यक्तिमत्त्व असणारे लोकांची सवय--

लोक बचत करण्यात यशस्वी ठरतात, कारण आर्थिक निर्णयांच्या बाबतीत बचत ही प्राथमिकता असते आणि त्यांची बचत निश्चितपणे होतेच.


“Do not save what is left after spending; instead spend what is left after saving.”

 

बचतीची काही कारणे... प्रामुख्याने तीन कारणे आहेत.

१) भविष्यकाळातील गरजांसाठी, (Future Needs- Retirement, Marriages, Studies )

२) आणीबाणीच्या वेळीसाठी, (Emergency Fund)

३) काही सुखद ध्येयांसाठी (GOALS-Home, Car etc.)

यापैकी पहिल्या दोन कारणांच्या बाबतीत असुरक्षितता व भीतीची भावना समाविष्ट असते, तर तिसऱ्या कारणाच्या बाबतीत सुरक्षितता व आनंदाची भावना जोडलेली असते.

आर्थिक व्यक्तिमत्त्वात मोडणाऱ्यांची स्वभाववैशिष्टये पुढीलप्रमाणे:

या प्रकारात मोडणारे लोक प्रत्यक्ष बचत व अप्रत्यक्ष बचत करीत असतात.

प्रत्यक्ष बचत जी पैशांची बचत असते…

           अप्रत्यक्ष बचत म्हणजे विजेची बचत, पाण्याची बचत, योग्य दरात वस्तू खरेदी करणे, विलंबामुळे दंड होऊ नये म्हणून दक्षता घेणे, काही वस्तू ज्या तात्पुरत्या लागतात त्या उसन्या घेणे, चैनीच्या वस्तू टाळणे, मनोरंजन जसे सिनेमा पाहणे टाळणे, वस्तू खरेदी करणे टाळणे, अनावश्यक सहली टाळणे, वस्तू नीट सांभाळणे, सामाईक प्रवास करणे, वस्तूंची योग्य देखभाल करणे, शक्य असेल तिथे मोटारसायकलऐवजी सायकलचा वापर करणे, फोन बिल, इंटरनेटचा योग्य वापर करणे वगैरे.

यामागील मनोवैज्ञानिक कारणे :

  1. भविष्याबद्दलची असुरक्षितता/भविष्याबद्दलची काही सुखद ध्येयांसाठी यांच्यात बचतीसाठीचा संयम विकसित झालेला असतो.

  2. विलंबित आनंद (Delayed gratification) हा गुण त्यांनी विकसित केलेला असतो.

येणाऱ्या अडचणी:-

  • ज्या लोकांमध्ये बचत करताना असुरक्षितता व भीतीची भावना असते ते लोक बचतीच्या प्रक्रियेचा आनंद घेत नाहीत, तर ज्या लोकांमध्ये बचत करताना सुरक्षितता व आनंदाची भावना जोडलेली असते ते या प्रक्रियेचा आनंद घेऊ शकतात.
  • अडचणींसाठी पैसा गरजेचा असतो असे मानल्याने हे लोक स्वत: त्या पैशांचा आनंद घेत नाहीत व बरीच उदाहरणे अशी असतात की, स्वत: आयुष्यभर काटकसरीत जगले व मेले व त्यांच्या मेहनतीचा पैसा इतरांनाच मिळाला.
  • बऱ्याचदा असुरक्षिततेच्या भीतीने हे लोक गुंतवणूकही करत नाहीत व त्यामुळे पैसे साठवतात, पण मोठय़ा प्रमाणात त्यात वाढ होत नाही.

उपाय :

असुरक्षिततेऐवजी सुखद ध्येय ही संकल्पना जर विचारात घेतली तर बचतीच्या प्रक्रियेचा हे लोक आनंद घेऊ शकतात.

  • फक्त बचत न करता एकाच वेळी बचत व गुंतवणूक ही गोष्ट अवलंबली पाहिजे.
  • फक्त बचतच न करता पैशाचा वापर सुखासाठीपण केला पाहिजे.


ब्लॉग पोस्ट आवडल्यास नक्की लाईक  व इतरांनां  शेअर करा. 

आणि  असेच नव- नवीन माहितीसाठी ब्लॉगला  सबस्क्राईब करा. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

म्युच्युअल फंडस संपत्ती निर्माणामध्ये मदत करू शकतात का?

म्युच्युअल फंड्स मधून आपण कोणत्या प्रकारच्या फायद्याची अपेक्षा करावी ?

आर्थिक नियोजनासाठी 'हे' टप्पे वापरणे गरजेचे......