एसआयपी (SIP) सुरू करताना त्या संबंधी पुढील तीन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू केली जाते.
एसआयपी (SIP) सुरू करताना त्या संबंधी पुढील तीन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू केली जाते.
१. एसआयपी ची रक्कम (Amount of SIP)
म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचा हा सर्वात सोपा आणि परिणामकारक मार्ग आहे. यामध्ये गुंतवणूकदार कमीतकमी रक्कम सातत्याने गुंतवू शकतो. म्हणजेच यामध्ये ५०० रुपयांपासून देखील एस आय पी ( SIP ) चालू करता येऊ शकते.
काही फंड मध्ये तर ही किमान रक्कम ५०० पेक्षा देखील कमी म्हणजे १०० रुपये असलेली पहावयास मिळते. परंतु साधारणतः गुंतवणुकदार कमीत कमी ५०० आणि जास्तीत जास्त त्याच्या मर्जीनुसार कोणत्याही रकमेची गुंतवणूक करू शकतो.
२. एसआयपी ची तारीख ( Date of SIP )
एसआयपी ( SIP ) मधील गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराला एसआयपी ची वारंवारता काय असेल हे आधीच निश्चित करून घ्यावे लागते. म्हणजेच एसआयपी मध्ये गुंतवणूक करण्याची तारीख ठरवून घ्यावी लागते. मग यामध्ये गुंतवणूकदार स्वतःच्या इच्छेनुसार तारीख निवडू शकतो. एसआयपी ची तारीख ही साप्ताहिक, मासिक, तिमाही किंवा वार्षिक देखील असू शकते. गुंतवणूकदाराला ठराविक तारखेला आपल्या एसआयपी रकमेचा भरणा भरावा लागतो.
३. एसआयपी चा कालावधी ( Maturity Period of SIP )
एसआयपी चा कालावधी म्हणजेच गुंतवणूकदाराला त्याची एसआयपी किती कालावधी पर्यंत चालू ठेवायची आहे तो काळ. म्हणजेच यामध्ये गुंतवणूकदाराला आपली एसआयपी एक वर्षासाठी, दोन वर्षासाठी, ५ किंवा १० वर्षांसाठी किंवा जोपर्यंत तो स्वतः एसआयपी बंद करत नाही तोपर्यंत एसआयपी चालू ठेवायची आहे हे ठरवावे लागते.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubts, please let me know.