श्रीमंत होण्यासाठी आर्थिक नियोजनाची आवश्यकता आहे का ?
हो….. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि संपत्ती निर्मितीसाठी आर्थिक नियोजन करणे अत्यावश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीचे आर्थिक नियोजन वेगवेगळे असू शकते किंवा ते तसे असतेच.
आर्थिक स्वातंत्र्य (Financial Freedom ) मिळवण्यासाठी आणि संपत्ती निर्मितीसाठी (Wealth Creation ) आर्थिक नियोजन (Financial Planning ) करणे अत्यावश्यक आहे .
तरुण वयात किंवा अगदी करियरच्या सुरुवातीच्या काळातच काळजीपूर्वक आर्थिक नियोजन करण्याची गरज आहे. तरुण जोडप्यानीदेखील यासंदर्भात त्यांच्या आर्थिक योजना आखणे महत्वाचे ठरते.
प्रभावी आर्थिक नियोजनासाठी काही सूत्रे लक्षात घेतली पाहिजेत, ती सूत्रे कोणती आहेत ते पाहूया.
(Financial Planning Tips : How to do Financial Planning to become rich)
१. विमा ( Insurance ) :-
आयुर्विमा ( Term Insurance ) आणि आरोग्यविमा ( Health Insurance ) याशिवाय तुमचे आर्थिक नियोजन पूर्णच होऊ शकणार नाही. योग्यवेळीच विमा (टर्म आणि आरोग्य ) घेणे आवश्यक आहे. त्यासाठी काही प्रमाणात पैशांची बचत करणे प्रत्येकासाठी महत्वाचे आहे. ग्राहकांच्या वाढत्या गरजा भागवण्यासाठी विविध प्रकारच्या विमा योजना बाजारात उपलब्ध आहेत. प्रत्येकाने काळजीपूर्वक आपल्यासाठी योग्य असलेली विमा पॉलिसी निवडली पाहिजे. वेळप्रसंगी या क्षेत्रातील जाणकारांचे मार्गदर्शन घ्यावे.
२. खर्चाचे अंदाजपत्रक ( Expenditure Budget ) :-
योग्य आर्थिक नियोजनापासून सुरुवात करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने त्यांच्या दरमहिन्याच्या उत्पन्नाचे आणि खर्चाचे अचूक आकलन करणे गरजेचे आहे. यामुळे सद्य आर्थिक परिस्थिती संदर्भात अंदाज बांधण्यास मदत होईल व यावर पुढील नियोजन ठरविता येईल.
३. आर्थिक उद्धिष्टांची मांडणी ( Financial Goal Setup ) :-
आर्थिक नियोजनातील हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. भविष्यातील आपल्या गरजा आणि अपेक्षा काय आहेत? प्रत्येकाने त्याचे अल्पकालीन ( Short Term ) आणि दीर्घकालीन ( Long Term ) भविष्य काय असेल आणि त्या पातळीवर पोहचण्यासाठी त्यांनी काय केले पाहिजे याची कल्पना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या अल्पकालीन ( Short term ) आणि दीर्घकालीन (Long Term ) आर्थिक गरजांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आपल्या या आर्थिक उद्दिष्टांवर विविध गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक केली पाहिजे.
४. आर्थिक सल्लागाराचे मार्गदर्शन ( Financial Advisor Guidance ) :- तज्ञाचे महत्व जसे इतर क्षेत्रात असते तसेच ते आर्थिक क्षेत्रातदेखील असते. बऱ्याच वेळा सर्वसामान्य नागरिक गोंधळात पडतात आणि विविध आर्थिक निर्णयाबद्दल घाबरतात. आपण गुंतवणूक करू नये किंवा गुंतवणूक करावी का? आपण गृह कर्ज घ्यावे का? करबचत कशी करावी? कोणत्या गुंतवणूक करावी? नेमकी कोणती विमा पॉलिसी घ्यावी? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांचा मनात असतात. यासाठीच आर्थिक सल्लागार नेमणे खूप महत्वाचे ठरते. आर्थिक सल्लगार कडून अशा प्रश्नांची उत्तरे मिळतात आणि पुढील मार्ग सुकर होतो.
५. कर नियोजन ( Tax Planning ) :-
भारतातील प्रत्येक नोकरदार, व्यावसायिकाने उत्पनाचे रक्षण करण्यासाठी प्रभावी कर नियोजन केले पाहिजे. ते गृह कर्ज घेऊ शकतात, विमा पॉलिसी किंवा बॉंडमध्ये गुंतवणूक करू शकतात किंवा मालमत्ता घेऊन घेतला पाहिजे. विविध करबचत करणाऱ्या गुंतवणूक प्रकारात पैसे गुंतवले पाहिजे. करवजावटीच्या सवलतीचा पूर्ण लाभ घेतला पाहिजे.
६. गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ ( Investment Portfolio ) :-
विमा, बचत, आणि उत्पन्नची काळजी घेण्याकरिता प्रत्येकाने गुंतवणूकीवरही विचार केला पाहिजे. यात म्युच्युअल फंड, बँकेतील किंवा पोस्टातील मुदतठेवी, सोने, रिअल इस्टेट, करबचतीसाठीच्या विविध योजना इत्यांदीचा उल्लेख करता येईल. यामध्ये गुंतवणूक करताना सलगारासोबत काळजी पूर्वक योजना आखली पाहिजे.
तुम्ही जितके तुमचे आर्थिक नियोजन ( Financial Planning ) लवकर आणि शिस्तबद्दपणे (Discipline ) कराल तितक्या लवकर तुम्ही श्रीमंत व्हाल आणि तुम्हाला तुमच्या मनासारखे आयुष्य जगता येईल. तुमच्या भविष्यातील आर्थिक गरजांची पूर्तता करणे तितकेच सुलभ आणि सोपे होईल.
ब्लॉग पोस्ट आवडल्यास नक्की लाईक व इतरांनां शेअर करा.
आणि असेच नव- नवीन माहितीसाठी ब्लॉगला सबस्क्राईब करा.
ब्लॉग पोस्ट आवडल्यास नक्की लाईक व इतरांनां शेअर करा.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubts, please let me know.